कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
आदर्शनगर, हुबळी येथील आपल्या निवासस्थानाच्या ठिकाणी आज रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. आमची भाजपची उमेदवार यादी योग्य वेळी जाहीर केली जाईल. आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत निवडणूक व्यवस्थापनावर होणार आहे असे सांगून अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, अंतर्गत आरक्षणाचा मुद्दा 30 वर्षापासून अस्तित्वात आहे. काँग्रेसने याबाबतीत शेवटच्या क्षणी हार पत्करली असली तरी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आरक्षणाच्याबाबत अभ्यास केला. मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून कायद्यानुसार काम केले आहे. आम्ही जे करू शकलो नाही ते भाजपने करून दाखविल्याचे खुद्द काँग्रेसचे सदस्य हताशपणे म्हणत आहेत, असे बोम्मई यांनी सांगितले.
आपल्याला नेहमीच एससी आणि एसटी समाजाची काळजी असल्याची विधाने करण्याद्वारे सहानुभूती दाखवून ही निवडणूक जिंकता येईल असे काँग्रेसला वाटत आहे. आम्ही सामाजिक आणि विकासाच्या मुद्द्यावर संघटनांची चर्चा करून अनेक निर्णय घेतले. निर्णायक निर्णय घेण्यामागे आमची बांधिलकी कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले. मधमाशांना हात लावल्याशिवाय मध मिळत नाही. त्यासाठी मी मधमाश्यांच्या पोत्यात हात घातला. मधमाशांचा डंख सहन करेन परंतु मी त्या समाजाला मधाचा एक थेंब तरी मिळवून देईन असे सांगून मला मधमाशा चावल्या तरी मी मधाची मिठाई वाटण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. ईडब्ल्यूएसमध्ये अल्पसंख्यांकांच्या समावेशाच्या मुद्द्यावर बोलताना पूर्वी 4 टक्के आरक्षण होते, आता 10 टक्के आरक्षण ठेवले आहे. हा न्याय कसा होऊ शकतो?
अल्पसंख्यांकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून म्हादाई योजनेबद्दल बोलताना म्हादाई योजनेची प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेमुळे गुंतागुंतीची झालेली नाही आचारसंहिता लागू असली तरी या योजनेची निविदा प्रक्रिया सुरूच राहणार आहे. इतकेच नाही तर या योजनेला वनखात्याकडून मंजुरी देखील मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.