शिवसेना बेळगाव सीमाभाग (ठाकरे गट) यांच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी गडहिंग्लज येथे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
गडहिंग्लज येथील कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलला काल शुक्रवारी मुंबईच्या माजी महापौर शिवसेना उपनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी भेट दिली. त्यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेनेच्या (उद्धवजी ठाकरे गट) पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बेळगावसह सीमाभागातील पक्ष संघटना बळकट करणे तसेच बेळगावशी संबंधित अन्य महत्त्वाच्या विषयांवर सुमारे अर्धा तास चर्चा केली.
याप्रसंगी शिवसेना बेळगाव सीमाभाग उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रदीप सुतार आदींसह बेळगावचे शिवसैनिक उपस्थित होते.