प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव -कोल्हापूर मार्गावर आता प्रथमच आज गुरुवार दि. 9 मार्चपासून वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या (एनडब्ल्यूकेआरटीसी) अतिरिक्त नॉनस्टॉप बसेस धावणार असल्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांचा प्रवास देखील सुलभ होणार आहे. बेळगाव आणि चिक्कोडी आगाराकडून या नवीन 12 नॉनस्टॉप बसेस प्रवाशांच्या सेवेस रुजू झाल्या आहेत.
बेळगाव -कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र बेळगाव आगारातून धावणाऱ्या बसेस हत्तरगी, संकेश्वर आणि निपाणी येथून कोल्हापूरला जात होत्या. त्यामुळे बेळगाव -कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाया जात होता.
त्यामुळे आता परिवहन महामंडळाने बेळगाव -कोल्हापूर मार्गावर नव्या अतिरिक्त 12 नॉनस्टॉप बसेस सुरू केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना कुठेही वेळ वाया न जाता थेट कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोईखातर दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत ही विशेष नॉनस्टॉप बस सेवा सुरू राहणार आहे.
मध्यवर्ती बस स्थानकातून दर अर्ध्या तासाने या नॉनटॉप बसेस सुटणार आहेत. विशेष म्हणजे थेट नॉनस्टॉप बस सेवा असली तरी तिकीट दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही.
बेळगाव ते कोल्हापूर नॉनस्टॉप बस सेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल 7:00, 7:30, 8:00, 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:30, 11:00. 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:30, 18:00, 18:30. परतीच्या मार्गावर कोल्हापूर ते बेळगाव बस सेवेची वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल.
7:00, 7:30, 8:00, 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 1630, 17:00, 17:30, 18:00, 18:30.