बेळगाव लाईव्ह : एका प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी महिला वकिलांना केलेल्या मारहाणी प्रकरणी वकिलांनी निषेध व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे
या घटनेची टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.
बेळगाव मधील महिला वकील कांचना गवळी यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप वकिलांनी केला असून या पार्श्वभूमीवर वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभू यत्नाट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
याप्रकरणी डीसीपी चंद्रशेखर यांच्याशी चर्चा करून संबंधितांवर तातडीने जबाबदारी सोपवावी. त्यांची बदली व्हावी, अशी मागणी करत पोलिस आयुक्त कार्यालयासमोर वकिलांनी आंदोलन छेडले.