येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येळ्ळूर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपक्रम आणि विकास कामांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे काल गुढीपाडव्यानिमित्त पंधराव्या आयोगांतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी हायमास्ट पथदीप आणि नामफलकाच्या उपक्रमाचे अनावरण तसेच सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला चालना देण्यात आली. तसेच अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत गावातील शाळांमध्ये प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य, अंगणवाडींना लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देणे. तसेच ई ग्रंथालयासाठी लागणाऱ्या सुधारित गोष्टी उपलब्ध करून देणे आदी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
विकासाच्या दृष्टिकोनातून येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असते हे अगदी प्रकर्षाने दरवेळी पाहायला मिळते आणि याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या पंधराव्या आयोगातून येळ्ळूर येथे हायमास्ट पथदीप आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
त्यानुसार गावातील प्रत्येक गल्ली, उपनगरे तसेच सार्वजनिक ठिकाणी नामफलक उभारण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. तसेच गावातील स्मशानभूमी चांगळेश्वरीदेवी मंदिर, समिती शाळा, वाडीशाळेसमोर, तसेच वाडीशाळा कन्नड आणि अवचारहट्टी येथे हायमास्ट पथदीप बसवण्याच्या योजनेचाही शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन रूपा पुण्ण्यान्नवर आणि प्रमोद पाटील तसेच दलित संघटनेच्या माध्यमातून कऱण्यात आले. हायमास्ट पथदीपाच्या कामाचे पूजन शिवाजी नांदुरकर आणि रमेश मेणसे यांच्या हस्ते तर नामफलकाचे उद्घाटन अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अनावरण दुदाप्पा बागेवाडी आणि मनोहर पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचप्रमाणे गुन्हेगारी व गैरकृत्यांना काळा घालण्यासाठी गावाच्या सुरक्षेसाठी ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या कामालाही यावेळी चालना देण्यात आली. या कामाचे उद्घाटन आनंद आप्पाजी पाटील आणि राजू डोण्ण्यान्नवर यांच्या हस्ते करण्यात आले.
अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गतही वेगवेगळ्या उपक्रमांना यावेळी चालना देण्यात आली. जसे की गावातील शाळांमध्ये प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करने, अंगणवाडींना लहान मुलांना खेळण्याचे साहित्य, तसेच ई ग्रंथालयासाठी लागणाऱ्या सुधारित गोष्टी उपलब्ध करून देणे आदी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रा. पं. सदस्य शिवाजी नांदुरकर, प्रमोद पाटील, रमेश मेनसे, पिंटू चौगुले, परशराम परीट, रूपा पुण्यानावर मनीषा घाडी, शशिकांत धुळजी, अरविंद पाटील, राजू डोण्ण्यान्नवर, नारायण काकतकर, मुख्याध्यापक अशोक कोलकर डि. एस्. एस् शाखा येळ्ळूरचे संस्थापक लक्ष्मण छत्र्याण्णावर, अध्यक्ष प्रमोदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष शशिकांत हुव्वाण्णावर, सेक्रेटरी परशुराम ताशिलदार, महेश हुव्वाण्णावर, माजी अध्यक्ष महेश ताशिलदार, कार्यकर्ते शटूप्पा कांबळे, भिमराव पुण्यान्नावर, दिपक हंडोरी, रूकमान्ना हुव्वाण्णावर, सुनिल कांबळे, रवि शिंगे, राजु होसुरकर, शटूप्पा पुण्यान्नावर आदिंसह गावातील नागरिक व युवक मंडळचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱी उपस्थित होते.