Tuesday, January 7, 2025

/

बेळगावकर जनता वेठीस!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विविध विकासकामांचे भूमिपूजन, कोनशिला, उद्घाटन याचप्रमाणे बेळगावच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाचे उदघाटन आणि जाहीर सभा… निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आखलेल्या पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्यामुळे आज संपूर्ण बेळगावमधील जनता वेठीला धरण्यात आली.

गेल्या आठवड्याभरापासून प्रशासकीय यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीत गुंतली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते डागडूजी करण्यात आले आहेत. संपूर्ण शहर भगव्या रंगात भाऊ निघाले आहे. निवडणुकीची रणनीती म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा किलोमीटर हुन अधिक पल्याचा रोड शो देखील आयोजित करण्यात आला. मात्र, सोमवारच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासूनच बेळगावकर जनतेला वेठीला धरण्यात आले आहे.

रविवारी दिवसभरात अनेक व्यावसायिकांनी, छोट्या विक्रेत्यांनी, फेरीवाल्यांनी आणि भाजी विक्रेत्यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याची धास्ती घेतली. सोमवारी सकाळपासूनच एपीएमसी येथील के एस आर पी मैदानापासून ते बी.एस. येडियुरप्पा मार्गापर्यंतच्या रोडशोच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा बेळगाव दौरा आखण्यात आला. मात्र, यामुळे संपूर्ण बेळगाव मधील जनतेला या ना त्या कारणामुळे वेठीला धरण्यात आले.Traffic jam modi visit

पंतप्रधानांचा रोडशो असल्याने संपूर्ण शहराच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता. यामुळे आधीच वाहतूक कोंडीने हैराण असलेल्या बेळगावकरांना पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुन्हा आज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी तासनतास वाहनाच्या रांगा ताटकळत उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगाव दौरा असल्याने अनेक भाजी विक्रेत्यांनी रविवारी कवडीमोल दरात भाजी विक्री केली.

अनेक हातच्या पोटावर उदरनिर्वाह चालवणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना सोमवारी व्यवसाय बंद असल्यामुळे फटका बसला. कित्येक ठिकाणी बसस्थानकावर प्रवासी ताटकळत उभे असलेले पाहायला मिळाले. शिवाय आज बेळगाव मध्ये कर्फ्यू सदृश परिस्थिती पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो वगळता संपूर्ण शहरात बंद सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.