आर्ट ऑफ लिविंग फौंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरुजी श्री श्री रवि शंकर यांनी दक्षिण काशी मंदिरात ध्यान धारणा केली.
श्री श्री रविशंकर यांनी दक्षिण काशी गणल्या गेलेल्या बेळगावच्या श्री कपिलेश्वर मंदिराला मंगळवारी भेट दिली.यावेळी त्यांनी श्री कपिलेश्वरांचे दर्शन घेतले.त्याचबरोबर काही वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा केली.
गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी सोमवारी बेळगाव भेटीवर आहेत. बेळगावात त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दरम्यान त्यांनी मंगळवारी सकाळी कपिलेश्वर मंदिराला भेट दिली.
गजाननराव भातखांडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत, भगव्या ध्वजांसह श्री श्री रविशंकर यांचे स्वागत केले कपिलेश्वर मंदिराच्या वतीने हस्ते पूजा अर्चना करण्यात आली.
त्यानंतर दक्षिणकाशी कपलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी, मंदिर व्यवस्थापन समितीचे राकेश कलघटगी, अभिजीत चव्हाण, दौलत साळुंखे, राजू भातखांडे,विनायक मनगुतकर व अन्य सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.
#artofliving
#srisriravishankar
#belgaum
#kapileshwar
दक्षिण काशीत श्री श्री रविशंकर गुरुजींची ध्यान धारणा#artofliving#srisriravishankar#belgaum#kapileshwar pic.twitter.com/kPHM8NpkrX
— Belgaumlive (@belgaumlive) February 7, 2023