Friday, January 10, 2025

/

मुचंडी येथे 4, 5 रोजी गाडा पळविण्याची जंगी शर्यत

 belgaum

मौजे मुचंडी (ता. जि. बेळगाव) गावातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी गल्ली यांच्यावतीने येत्या शनिवार दि. 4 व रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी एका बैल जोडीने रिकामा गाडा पळविण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

मुचंडी ते मुतगा संपर्क रस्त्याच्या बळ्ळारी नाल्या जवळील पुलाशेजारी ही जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. शर्यतीतील पहिल्या 15 क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

यापैकी पहिल्या सहा क्रमांकाची बक्षीसे अनुक्रमे रुपये 15,000, 14,000, 13,000, 12,000, 11,000 व रुपये 10,000 अशी असणार आहेत. येत्या शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस चालणाऱ्या या जंगी शर्यतीची वेळ 1 मिनिट असणार असून प्रवेश शुल्क 2,100 रुपये इतकी आहे.

तरी सदर शर्यतीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या बैलजोडी मालकांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी 8150015330, 8496955757, 8748857905 अथवा 7676005984 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक लक्ष्मी गल्ली, मुचंडी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.