बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.
मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मोर्चा बाबत व इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. तरी म. ए. समिती
पदाधिकारी, नागरिक, युवक, महिला आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे.
याबरोबरच महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रदेशातील मराठी भाषिक युवक व युवतीसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे अर्जुननगर (निपाणी) येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचा लाभ सीमा भागातील मराठी भाषिकांनी घ्यावा असे आवाहन समितीने केले आहे.
मागील काही महिन्यापासून शहर समितीची एकही बैठक झालेली नाही आगामी विधानसभा निवडणुकीचे तोंडावर शहर समितीचे अग्निहोत होती अखेर मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर समितीची बैठक जाहीर करण्यात आलेली आहे.