Tuesday, November 19, 2024

/

पंतप्रधान कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक

 belgaum

माननीय पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाचा बंदोबस्त आणि शिष्टाचारामध्ये कोणतीही उणीव, दोष राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. सर्वांनी समन्वयाने काम करून हा कार्यक्रम यशस्वी करावा, अशी सूचना कृषी खात्याच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केली.

बेळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात आज गुरुवारी सकाळी आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचा बंदोबस्त आणि शिष्टाचाराबरोबरच कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थींना सुरक्षितपणे कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी आणि पुन्हा माघारी घेऊन जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी वाहनाद्वारे वाहतुकीची व्यवस्था केली जावी.

पंतप्रधानांचा ज्या मार्गांवरून संचार असणार आहे ते मार्ग सुस्थितीत असावेत. यासाठी आवश्यक ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती अथवा नवनिर्माण केले जावे. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थींसह सर्वसामान्य जनतेसाठी शुद्ध पिण्याचे पाणी आणि दर्जेदार भोजन पुरविले जावे. याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक ठिकाणी अन्न सुरक्षातता अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली जावी. फक्त मान्यवर मंडळीच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवली जावी. त्याकरिता वैद्यकीय पथकं आणि रुग्णवाहिका तैनात केल्या जाव्यात आदी सूचना मंत्री शोभा करंदलाजे यांनी केल्या.Meeting modi visit

कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आत्ताच पूर्वतयारीची सर्व कामे हाती घेण्यात आली असून सर्व ती जय्यत तयारी केली जाईल, असे सांगितले. वाहतुकीची व्यवस्था व्यासपीठाचे निर्माण, पार्किंग, भोजन व्यवस्था वगैरे सर्व गोष्टींची तयारी सुरू आहे, असे ते म्हणाले. जलजीवन मिशन अंतर्गत बहुग्राम पिण्याचे पाणी योजनेच्या 1100 कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांचा ज्या मार्गान वरून संचार होणार आहे. त्या रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि सौंदर्यिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सुमारे एक लाख लोक जमतील असा अंदाज आहे. कार्यक्रम स्थळी कोणतीही गैरसोय होऊ नये या पद्धतीने आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, एलईडी स्क्रीन, अंतर्गत संपर्क व्यवस्था वगैरे आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता केली जात आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.