Saturday, January 18, 2025

/

महिला के ए एस अधिकाऱ्याच्या पतीची आत्महत्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पिरजादे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडल आहे.

जाफर पिरजादे हे अनेक वर्षांपासून बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून सेवा बजावत होते. आज दुपारी त्यांच्या आत्महत्येची बातमी सर्वत्र पसरली असून एपीएमसी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.Jaffer peerjade

उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवगृहात हलविण्यात आला आहे. सध्या ते प्रथम दर्जा लिपिक म्हणून सेवा बजावत होते. डीटीआयमध्ये एफडीएचे प्रशिक्षण घेत असलेल्या जाफर पीरजादे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

पत्नी रेश्मा तालिकोटी या कामासाठी बंगळुरूला गेल्या होत्या यादरम्यान जाफर पिरजादे यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.