यंदाचे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असताना शहरातील तब्बल 71,446 मिळकत धारकांनी महापालिकेकडे चालू आर्थिक वर्षातील घरपट्टी अद्यापही भरली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगाव महापालिकेचा महसूल विभाग सध्या घरपट्टी वसुलीच्या कामात व्यस्त असला तरी तब्बल 71,446 इतक्या मोठ्या संख्येने घरपट्टी थकबाकीदार असल्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे 31 मार्च आधी पुढील अवघ्या 35 दिवसात घरपट्टी कशी वसूल होणार? हा प्रश्न आहे.
बेळगाव शहरातील महापालिकेच्या 58 प्रभागांमध्ये 1 लाख 46 हजार 468 मिळकती आहेत. सदर मिळकतींपैकी गेल्या 22 फेब्रुवारी पर्यंत 75 हजार 22 मिळकतदारांनीच महापालिकेकडे घरपट्टी भरली आहे.
महापालिकेच्या महसूल विभागासमोर चालू आर्थिक वर्षात 55 कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. यापैकी 45 कोटी रुपये घरपट्टी वसूल झाली असल्यामुळे अद्याप 10 कोटी रुपये वसूल होणे बाकी आहे.
बेळगाव शहरातील मिळकतींचे थोडक्यात विवरण पुढील प्रमाणे आहे. अधिकृत निवासी -90,799, अनधिकृत निवासी -17,539, अधिकृत व्यापारी -10,466, अनधिकृत व्यापारी -641, अधिकृत अन्य मिळकती -19,986, अनधिकृत मिळकती -7037.