ग्रामपंचायत यांनी स्थानिक पातळीवर स्वयंशासित संस्था म्हणून प्रभावीपणे काम करावे, राज्यातील चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने देण्यात येणाऱ्या 2021 -22 मधील गांधीग्राम पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यामध्ये बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी 2013-14 पासून प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतची गांधीग्राम पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यासाठी 5 लाखांचा पुरस्कार दिला जातो. 2021 -22 या वर्षासाठी गांधीग्राम पुरस्कारासाठी ग्रामपंचायतच्या निवडी बाबत पंचायतीकडून 250 गुणांच्या प्रश्नावलींची ऑनलाईन प्रश्नोत्तरे घेतली होती.
या पुरस्कारासाठी यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीं व्यतिरिक्त इतर पंचायतीकडून अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातील प्रारंभी तीन पंचायतींची निवड करून त्यांची पाहणी करून प्रश्नोत्तरातून ही निवड करण्यात येणार होती.
त्यानुसार निवड करण्यात येऊन बेळगाव तालुक्यातील हिंडलगा, खानापूर तालुक्यातून लोंढा, निपाणी तालुक्यातून जत्राट व चिक्कोडी तालुक्यातून जागनूर ग्रामपंचायतची निवड झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अथणी -नंदगाव, बैलहोंगल -बेळवडी, बेळगाव -हिंडलगा, चिक्कोडी -जागनूर, गोकाक -मेळवंकी, हुक्केरी -हेब्बाळ, कागवाड -मोळे, खानापूर -लोंढा, कित्तूर -कुलहळ्ळी, मुडलगी -हळ्ळूर, निपाणी -जत्राट, रामदुर्ग -औरादी, रायबाग -निलजी, सौंदत्ती -बेटसूर.