Sunday, January 5, 2025

/

गोकाकमधील ‘त्या’ उद्योजकाचा खून आर्थिक व्यवहारातून

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोकाक येथील राकेश झंवर या उद्योजकाचा खून कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आले आहे. कोट्यवधींची कर्ज रक्कम परत मागितल्याने सदर उद्योजकाचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी आरोपी डॉ. सचिन शिरगावी आणि शिवानंद पाटील यांना अटक करण्यात आली असून डॉ. सचिन शिरगावी या आरोपीने पोलिसांकडे गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू ठेवला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, गोकाकचे डीएसपी मनोजकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली असून गोकाक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट्यवधी रुपयांचे कर्ज डॉ. सचिन शिरगावी यांना देणाऱ्या उद्योजक राकेश झंवर यांनी आपले पैसे परत मागितल्याने त्यांचा खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आरोपी डॉ. सचिन शिरगावी आणि त्याच्या साथीदारांनी व्यापारी राजू झंवर यांना मार्कंडेय नदीच्या योगी कालवा येथे नेले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह कोळवी गावाजवळील घटप्रभा नदीत फेकून दिल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.Sanjiv patil sp

बेळगावचे एस.पी. संजीव पाटील यांनी शनिवारी सकाळी गोकाक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावेळी मृत राकेश झंवर यांच्या पत्नीने डॉ. सचिन शिरगावीची ओळख सांगितली. यावरून या प्रकरणाचा तपास केला असता प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मृत राकेश झंवर या उद्योजकाचा खून करून आरोपींनी नाल्यात मृतदेह फेकला असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप मृतदेहाचा शोध लागलेला नाही. मृतदेह शोध मोहिमेदरम्यान कालव्याजवळ राकेश झंवर यांचे साहित्य आढळून आले आहे. मृतदेह शोधण्यासाठी नेमलेल्या पथकात तीन डी.वाय.एस.पी., 9 पीएस, एनडीआरएफ, जलतरण तज्ञांचा सहभाग आहे. सदर कालवा सीमा ओलांडून बागलकोट जिल्ह्यात गेला आहे, त्यामुळे तेथेही सात पथके कार्यरत असून बागलकोटचे एएसपी देखील मृतदेह शोधण्यात गुंतले आहेत.

पोलीस तपासात गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमेवर ३७-४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळवी कालव्यात मृतदेहाचा शोध सुरू आहे. मृतदेह आढळल्यास तातडीने पोलिसांना कळविण्यात यावे, असे आवाहनही स्थानिकांना करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.