देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे सर्वसामान्यांची सहानुभूती असलेला शेतकरी याबाबतीत टाहो पडत असताना राज्यकर्त्यांचे मात्र शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे हे आम आदमी पक्षाचे नेते खुद्द बेंगलोर शहराचे माजी आयुक्त भास्कर राव आणि बेळगावचे युवा नेते राजकुमार टोपण्णावर यांनी आपल्या एका व्हिडिओद्वारे जगजाहीर केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भास्कर राव व टोपण्णावर यांच्या व्हिडिओवरून शेतकऱ्यांवर ओढवलेली बिकट परिस्थिती कोणाच्याही लक्षात येऊ शकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेळ्या मेंढ्या एका कोबीच्या पिकामध्ये मुक्तपणे वावरत कोबी व कोबीच्या पाला चरताना दिसतात.
खरं तर काबाडकष्ट करून पिकवलेले एखादे पीक जपण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतो. मात्र सध्या कोबीला बाजारपेठेत प्रति किलो फक्त 1 रुपये इतका दर असल्यामुळे शेतकऱ्यांना घाम गाळून पिकविलेल्या कोबीच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. प्रत्येक पिकाच्या प्रामुख्याने पालेभाज्यांच्या पिकांच्या बाबतीत दर मोसमात सरकारने हमीभाव ठरवावा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पिकांना दर दिला जावा, अशी शेतकरी संघटनांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
मात्र आजपर्यंतच्या सत्ताधारी सरकारने ही बाब कधीच गांभीर्याने घेतलेली नाही त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर सातत्याने अन्यायात होत आला आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आम आदमी पक्षाचे (आप) नेते खुद्द बेंगलोर शहराचे माजी आयुक्त भास्कर राव आणि बेळगाव येथील आपचे धडाडीचे युवा नेते राजकुमार टोपण्णावर यांनी सोशल मीडियावर शेळ्या मेंढ्या कोबीच्या पिकात चरतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. सदर व्हिडिओ अल्पावधीत लोकप्रिय होऊन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोबीचे दर गडगडल्याने बेळगावातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे, शिवाय कोबी शिवारातच पडून असल्याचे चित्र दिसत आहे कोबीचा दर प्रति किलो 3 ते 4 रुपये झाल्याने मजुरी आणि वाहतूक खर्च देखील निघेनासा झाला आहे. त्यामुळे एकूण उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. परिणामी शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. या खेरीज शिवारातील कोबीचे आता काय करावे? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
रब्बी हंगामा कडधान्याबरोबर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. कोबी, फ्लॉवर, ओली मिरची, बीन्स, वांगी, टोमॅटो, काकडी, गाजर यासह इतर भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या इतर भाज्या वगळता कोबीचा दर अगदी कमी झाला आहे. त्यामुळे कोबीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांसमोर विक्रीचा पेच निर्माण झाला आहे.
https://www.hindustantimes.com/cities/bengaluru-news/twitter-discussion-on-video-of-goats-grazing-in-a-cabbage-farm-101676447358869.html