Monday, November 18, 2024

/

तिसरे रेल्वे गेट ते गोवावेस रस्त्यासंदर्भात महापौरांना निवेदन

 belgaum

टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते बसवेश्वर सर्कल गोवावेस या रस्त्याच्या व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यापूर्वी संबंधित मार्गावरील विकास कामे त्वरेने पूर्ण करून ते मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करावेत, अशी मागणी अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी एका निवेदनाद्वारे महापौरांकडे केली आहे.

महापालिकेत जाऊन माजी नगरसेवक विनायक उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे यांना सादर केले. महापौरांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. व्हाईट टॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असल्यामुळे टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते बसवेश्वर सर्कल गोवावेस पर्यंतच्या बेळगाव खानापूर रोडवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी माध्यम व पोलिसांकडून समजते. मात्र वाहतूक वळविण्यापूर्वी ज्या मार्गाने वाहतूक वळविण्यात येत आहे ते मार्ग व्यवस्थित आहेत की नाहीत? याची शहानिशा केली जावी.

कारण सध्या ज्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात येत आहे त्यापैकी बहुतांश मार्गावर विविध विकास कामे हाती घेतली जात आहेत. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन वाहन चालकांची गैरसोय होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. परिणामी आपली कामे वेळेत होत नसल्याने जनतेला मनस्ताप होत आहे. यासाठी एकाच वेळी सर्व ठिकाणी कामे सुरू न करता एकावेळी एकाच मार्गावरील विकास कामे पूर्ण केली जावीत. सध्या तिसरे रेल्वे गेट ते बसवेश्वर सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे व्हाईट टॉपिंगचे काम सुरू आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हे काम मजबूत दर्जेदार करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेला डांबरी खोदून व्हाईट टॉपिंग घातले गेले पाहिजे. मात्र तसे न करता कंत्राटदाराकडून थेट डांबरी रस्त्यावरच व्हाईट टॉपिंग घातले जात असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता विकासाच्या नावाखालील घातल्या जात असलेल्या एकावर एक थरामुळे रस्त्याची उंची वाढवून पावसाळ्यात पावसाचे पाणी आसपासच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका आहे.Gunjatkar

याव्यतिरिक्त नियमानुसार एखाद्या रस्त्याचे टॉपिंग करण्यापूर्वी त्या रस्त्याच्या ठिकाणी असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन, फोन केबल लाईन, इलेक्ट्रिसिटी केबल, गॅस पाईप लाईन वगैरे मूलभूत सुविधांची कामे प्रथम केली गेली पाहिजेत. जेणेकरून एकदा का रस्त्याचे टॉपिंग झाले की त्यानंतर किमान 10 ते 15 वर्षे कोणत्याही कारणास्तव संबंधित रस्त्याचे नुकसान होणार नाही. मात्र तिसरे रेल्वे गेट ते बसवेश्वर सर्कल पर्यंतच्या रस्त्याच्या बाबतीत दुर्दैवाने यापैकी कांहीही न करता थेट व्हाईट टॉपिंग घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महोदय बेळगाव शहरात अनेक नामांकित अनुभवी वास्तु शिल्पकार, अभियंता, समाजसेवक आणि लायन्स क्लब, रोटरी क्लब यासारख्या बऱ्याच नामवंत बिगर सरकारी सेवाभावी संस्था -संघटना आहेत.

शहरातील विकास कामे दीर्घकाळ टिकणारी दर्जेदार होण्यासाठी सल्ला देण्यास ते कायमच तयार असतात. तेंव्हा कृपया एखादा विकास प्रकल्प अथवा विकास काम हाती घेण्यापूर्वी या मंडळींच्या सल्ला -सूचना जाणून घ्याव्यात, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.