Tuesday, February 11, 2025

/

सेंट्रल हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सेंट्रल हायस्कुलमधील इयत्ता १० वीच्या १९८८ च्या बॅचचा कौटुंबिक स्नेह मेळावा नुकताच पार पडला. साधारण पन्नाशीच्या घरात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.

ज्यांचा जन्म 1970 ते 75 सालात झाला ही पिढी आज पन्नाशी पार करून साठीला लागली आहे. एक पैसे ते दोन, पाच, दहा, वीस पैसे बघितलेली ही पिढी पेन्सिल,पेन, बोरु कॉम्प्युटर लॅपटॉप स्मार्टफोन हाताळत आहे.

पूर्वीच्या काळी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सायकल वरून फिरणारी मंडळी आज स्कूटर, चारचाकी चालवत आहे. बालपणी गोल्ड स्पॉटची बिल्ले, माचिसचे छाप, सिगारेटची पाकिटे अशा निरुपयोगी वस्तूच्या माध्यमातून खेळ खेळण्याचा कधीच कमीपणा वाटून न घेणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत येऊन त्याच जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यशोदा लॉन्स, स्वातंत्र्यवीर बॅ. विनायक दामोदर सावरकर नगर, मंडोळी रोड, बेळगांव येथे आयोजिण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात बालपणीचे सर्व खेळ उत्साही वातावरणात खेळण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव येथील विशाल कन्स्ट्रकशन्सचे प्रमुख व सेंट्रल हायस्कूलचे माजी विद्यार्थी विजय भरमा पाटील हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी बालपणीच्या खेळांचा उत्साहाने, बेभानपणाने आनंद लुटला.Central school students

प्रा. मायाप्पा पाटील यांचे सूत्रसंचलन, गिरीष यांच्या नावीन्यपूर्ण कल्पकतेतून संपन्न झालेला स्नेहमेळावा इतर विद्यार्थ्यांसाठीही अनुकरणीय असा ठरला. यावेळी सचिन उसुलकर आणि किरण हणमशेठ यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यास विनोद हंगीरकर, गिरीश धामणेकर, संजय हिशोबकर, प्रफुल्ल शिरवलकर, विकास मांडेकर, आदिनाथ सालगुडे, चंद्रशेखर पाटणेकर, कुमार खानोलकर, राजू कावळे, लक्ष्मीकांत हावळ, यांनी विशेष परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.