हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर पुरस्कृत आणि फ्रेंड्स ग्रुप हिंडलगा आयोजित बेळगाव ग्रामीण भाग मर्यादित मन्नोळकर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या रविवार 12 रोजी फेब्रुवारी पासून खेळविली जाणार आहे.
‘एक गाव एक संघ’ या धर्तीवर बेनकनहळ्ळी हायस्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख व आकर्षक करंडक तर उपविजेत्या संघाला 50 हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
मन्नोळकर चषक भव्य क्रिकेट स्पर्धेला 12 रोजी प्रारंभ pic.twitter.com/y0Wwr2gCYR
— Belgaumlive (@belgaumlive) February 10, 2023
याव्यतिरिक्त स्पर्धेतील उत्कृष्ट संघ या पुरस्कारासह प्रत्येक सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षीसही पुरस्कृत करण्यात आली आहेत.
तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी संघांनी आपली नावे स्पर्धा सचिव प्रमोद पवार व विनायक कुलकर्णी यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.