वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दरवर्षी निवडक साहित्य प्रकारातील उत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांना पुरस्कार दिले जातात. यावर्षी सुद्धा ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ कालावधीसाठी पुढील विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत. रोख रक्कम रु.२५००/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असेल.
वाङ्मय चर्चा मंडळाचा साहित्य पुरस्कार- समीक्षा, संशोधन विषयातील – (उत्कृष्ट ग्रंथासाठी), कृ. ना. हुईलगोळ पुरस्कार – (ललित लेखनासाठी) कविवर्य कृ. ब. निकुंब साहित्य पुरस्कार – (उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी) वि. ना. मिसाळ साहित्य पुरस्कार (कथासंग्रहासाठी), वाङ्मय चर्चा मंडळाचा विशेष साहित्य पुरस्कार (कादंबरीसाठी)
०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या लेखकांनी वाङ्मय चर्चा मंडळ, किर्लोस्कर रोड, बेळगांव ५९०००१ या पत्त्यावर लेखक / प्रकाशक यांच्या माहितीसह दि. १ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा तयारीने रजिस्टर पोस्ट किंवा स्पीड पोस्टने प्रत्येकी दोन प्रती पाठवाव्यात.
निर्धारित कालावधीत प्रकाशित झालेल्या एका लेखकाच्या एकापेक्षा अधिक साहित्यकृती पाठविता येतील असे मंडळाने कळविले आहे. कार्यालय वेळ ; दु. ३.०० ते सध्या; ७.०० मोबईल न; ८२१७०६८५०२