बेळगाव लाईव्ह विशेष:गेली पाच दिवस सुरू असणारी शिव सन्मान पद यात्रा रेल्वे स्थानकावर समाप्त झाली.किल्ले राजहंस गडा पासून सुरू असलेली पद यात्रेची बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसवून यशस्वी सांगता झाली.
रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने बेळगाव रेल्वे स्थानकावर शेकडो शिवसैनिक आणि भीमसैनिकांच्या एकजुटीने झालेल्या आंदोलना नतंर दोन्ही थोर पुरुषांची शिल्प बसवण्यात आली.सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगाव रेल्वेवस्थानकाचे लोकार्पण होणार आहे त्या पूर्व संध्येला आंदोलन करत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही महा पुरुषांची प्रतिमा स्थापित केल्या.यावेळी छ्त्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.रात्री साडे बारा पर्यंत हे आंदोलन सुरू होते.
रविवारी दुपारी पासूनच दलित कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू केले होते त्या आंदोलनास रमाकांत कोंडूस्कर यांनीही भेट देत पाठिंबा दर्शवला होता. रेल्वे स्थानकाच्या इमारती वर स्थापित न करता छत्रपती शिवराय आणि डॉ आंबेडकर यांची तैल चित्रे गोडाऊन मध्ये ठेवण्यात आली होती तीच शिल्पे रेल्वेगेट वर ठेवत दलित कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले होते.नेमक्या याच मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनर खाली रमाकांत कोंडुस्कर यांनी किल्ले राजहंस गड ते बेळगाव रेल्वे स्थानक अशी शिव सन्मान पदयात्रा सुरू केली होती.
रविवारी सायंकाळी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्व संध्येला याची सांगता होणार होती.रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांचे शिल्प बसावे आणि रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिव सन्मान पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
दलित संघटनेचे रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारा समोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील शेकडो पदयात्रेतील शिवभक्तांनी मिळून शिव शक्ती आणि भीम शक्तीची एकजूट तयार झाली आणि जोरदार ठिय्या आंदोलन झाले.दक्षिण पश्चिम रेल्वेचे जी एम हर्षा खरे यांनी अनेकदा विनवणी केली तरीही शिव आणि भीम भक्तांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा लपवलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली.
अखेर रेल्वे प्रशासनाने आंदोलका पुढे झुकत महापुरुषांच्या प्रतिमेचा अपमान केलेल्या वर कारवाई करण्याची लेखी हमी दिली नूतन रेल्वे स्थानकात उजव्या बाजूला तात्पुरता स्टेज उभारत दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा स्थापित केल्या.आगामी काही दिवसांत रेल्वे स्थानकात दोन्ही शिल्पाना कायमस्वरूपी स्थापित केले जाणार आहे.या शिवाय शिवराय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा देखील नूतन इमारतीत बसवण्यात आल्या.
बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांचे शिल्प बसल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून रमाकांत कोंडूस्कर यांनी काढलेली शिव सन्मान पदयात्रा यशस्वी झाली आहे. सदर आंदोलन यशस्वी झाल्याने शिव शक्ती आणि भीम शक्तीच्या एकीची ही नांदी देखील ठरली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी महापौर शिवाजी सूंठकर,युवा नेते आर एम चौगुले,युवा आघाडीचे चेतन पाटील दलित नेते मल्लू रायागोळ आदीसह प्रशांत पाटील आदी शिवभक्तांनी देखील रेल्वे स्थानका परिसराला भेट दिली. आंदोलनात समितीचे शंकर बाबली महाराज,दत्ता जाधव,सागर पाटील,मदन बामणे, महादेव पाटील गौरंग गेंजी स्वाती गेंजी,गुणवंत पाटील,शिवानी पाटील,साधना पाटील चंदू कोंडूस्कर आदींनी सहभाग घेतला.