बेळगाव न्यायालय आवारात सुरू असलेल्या विकास कामाच्या ठिकाणी असलेल्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून याकडे पाणीपुरवठा खात्यासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
बेळगाव न्यायालय आवारात रस्त्यांचे बांधकाम वगैरे विकास कामे राबविले जात आहेत. मात्र हे सुरू असताना सध्या येथील पाण्याची पाईपलाईन अर्थात जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून सर्वत्र चिखलाची दलदल पसरून पाण्याचे तळी निर्माण झाली आहेत.
न्यायालयातील विकास कामामुळे रहदारीस अडथळा तर झालाच आहे शिवाय आता फुटक्या जलवाहिनीतून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र अद्यापही संबंधित जलवाहिनी दुरुस्तीकडे पाणीपुरवठा खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे न्यायालय आवारात ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होण्याबरोबरच पाणीपुरवठा खाते आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने शंख केला जात असल्याचे पहावयास मिळत आहे.