बेळगाव शहरात विकास कामांचा धडाका लावणाऱ्या आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा 27 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे.
कर्नाटक सरकारच्या नुकत्याच झालेल्या शेवटच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बेळगाव येथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल उभारणीसाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत 27 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
बेळगावमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचा विकास, मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती आदींद्वारे आरोग्य आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरवणाऱ्या आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव अलीकडेच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनाप्रसंगी बेळगावात क्रिटिकल केअर हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या सचिवांना निवेदन सादर केले होते.
त्याचेच फलित म्हणजे केंद्राकडून क्रिटिकल केअर हॉस्पिटल उभारणीसाठी अनुदान मंजूर झाले आहे. सदर अनुदान मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांना बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी धन्यवाद दिले आहेत.