कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनविरोधात एकीकरण समितीने 2021 मध्ये महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्यासह 29 जणांना नोटीस बजावण्यात आले आहे.
त्यावर 21 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
कर्नाटक सरकारने डिसेंबर 2021 मध्ये आयोजित केलेल्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता.
पण महापालिकेने या महा मेळाव्याला विरोध करत टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावर आज शुक्रवारी दीपक दळवी मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, रेणू किल्लेकर,यांच्यासह 29 जणांना आज नोटीस बजावण्यात आले आहे.
त्यावर 21 जानेवारी रोजी चौथे जयंती न्यायालय या ठिकाणी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.समितीच्या वतीने एड. महेश बिर्जे, बाळासाहेब काकनकर, एम. बी. बोंद्रे काम पहात आहेत.
याच महामेळाव्या दरम्यान समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाही फासली होती.