गोवावेस सर्कल ते पेट्रोल पंपा शेजारील श्री दत्त मंदिर येथील रस्त्याशेजारी गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर सध्या वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गोवावेस सर्कल ते पेट्रोल पंपा शेजारील श्री दत्त मंदिर येथील रस्त्याशेजारी गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आहे. सदर विकास कामामुळे या बेळगाव -खानापूर दुपदरी रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे श्री दत्त मंदिरा बाजूच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होताना पहावयास मिळत आहे. सध्या दुचाकी, चार चाकी, ट्रक, बस वगैरे सर्वच वाहने या ठिकाणी एकाच रस्त्यावरून ये -जा करत असल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे गोवावेस सर्कल येथे वाहनांची गर्दी होत आहे.
त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून विशेष करून येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटकडून गोवावेस मार्गे शहापूरकडे आणि शहापूरकडून पहिल्या गेटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना खानापूर रोड ओलांडणे कठीण जात आहे.
त्यामुळे त्यांना भोवाडा घालून इच्छित स्थळी जावे लागत आहे. एकंदर शहरातील ‘स्मार्ट सिटीचे काम 12 महिने थांब’ या प्रकारचे झाले असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच केंव्हा स्मार्ट सिटी योजनेच्या त्रासातून आपली मुक्तता होणार? असा संताप्त सवाल केला जात आहे.