दिवसाढवळ्या घरात कोणी नसलेले पाहून कुलूप तोडून घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली आझाद गल्ली परिसरात घडली आहे.
शहरातील आझाद गल्ली येथील निवासी हरीश प्रजापत यांच्या घरातील घराचा कुलूप तोडून बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान अज्ञातानी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकासह तपास केला.
बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांची बदली अन्यत्र झाली आहे त्यानंतर मार्केट पोलीस स्थानकाची जबाबदारी कोणाकडे जाणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत असून सीसीबी चे पोलीस निरीक्षक निंगन गौडा पाटील यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.