Saturday, December 21, 2024

/

आम. अनिल बेनके क्रिकेट चषकाची क्रिकेटवीरांना सुवर्णसंधी

 belgaum

बेळगाव : बेळगावमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंकडून होत असलेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी क्रिकेट चषक स्पर्धेची घोषणा केली आहे.

येत्या ६ जानेवारी २०२३ रोजी क्रिकेटचे हक्काचे मैदान असणाऱ्या ‘सरदार्स’ मैदानावर ‘आम. अनिल बेनके पुरस्कृत, ऑल इंडिया लेव्हल टेनिसबॉल क्रिकेट टूर्नामेंट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून ५ लाख १ रुपये आणि द्वितीय पारितोषिक २ लाख ५० हजार रुपये याचप्रमाणे मॅन ऑफ दि सिरीज ला ‘रॉयल इन्फिल्ड दुचाकी’ देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत देशभरातील क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. बेळगावसह हुबळी, धारवाड, गोवा, मुंबई, सावंतवाडी,गुजरात, राजस्थान, बेंगळुरू, उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणाहून क्रिकेट संघांनी नोंदणी केली आहे.Benke mla

गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावमध्ये अशी भव्य स्पर्धा आयोजिली गेली नाही. बेळगावमध्ये अनेक क्रिकेटप्रेमी आहेत ज्यांच्याकडून वारंवार स्पर्धा भरविण्याची मागणी पुढे येत होती. या मागणीचा विचार करून क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशभरातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सर्व बेळगावकर क्रिकेटप्रेमींना उपलब्ध करून देण्यात आली असून हि स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बेळगावकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.