बेळगाव लाईव्ह : हल्ली विविध क्षेत्रात करियर करण्याच्या संधी आजकालच्या विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत. एव्हिएशन इंडस्ट्रीही यापैकीच एक. या क्षेत्रात काम करायचे असेल तर योग्य प्रशिक्षण आणि चिकाटीची नितांत आवश्यकता आहे. कार्यकुशलता आणि भाषाशैली तसेच संवाद कौशल्य असणारे उमेदवार या क्षेत्रात भरारीने यश गाठू शकतात हि बाब बेळगावच्या तस्फीया पटवेगार या विद्यार्थिनीने सिद्ध केली आहे.
बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ हि संस्था या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी योग्य संधी उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाली आहे. आजतागायत असंख्य विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून आपले करियरमधील यश गाठण्यात यशस्वी झाले आहेत. बेळगावमधील न्यू गांधीनगर येथील रहिवासी तस्फीया मैनुद्दीन पटवेगार हि विद्यार्थिनी देखील यापैकीच एक.
शेख सेंट्रल इंग्लिश माध्यमात शालेय शिक्षण पूर्ण करून सेंट पॉल येथे वाणिज्य शाखेतून पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या तस्फीया पटवेगार हिने ‘फिनिक्स’ची निवड केली. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्येच करियर करण्याचा निर्णय घेतलेल्या तस्फीया पटवेगार हिला ‘फिनिक्स’कडुन योग्य प्रशिक्षण मिळाले. या अकादमीत प्रत्यक्षात १ वर्षाचा अभ्यासक्रम आहे. मात्र तस्फीया पटवेगार मधील असलेल्या कलागुणांमुळे अवघ्या ४ महिन्यातच तिची निवड झाली. फिनिक्स अकादमीमधील कुशल प्रशिक्षकांच्या मदतीने ४ महिन्यातच तस्फीया पटवेगार हिने आपले प्रशिक्षण पूर्ण केले.
तस्फीया पटवेगार हि सध्या बेंगळुरू येथे एअर फ्रान्स कंपनीमध्ये ग्राउंड स्टाफ अंतर्गत पॅसेंजर-कस्टमर सर्व्हिस मध्ये डे-स्टाफ इन्चार्ज या सेवेसाठी कार्यरत आहे. गेल्या ९ महिन्यांपासून तस्फीया या कंपनीत कार्यरत असून आपल्या यशामध्ये ‘फिनिक्स’ चे मोठे श्रेय असल्याचे ती सांगते.
बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ हि संस्था माफक दरात, उत्कृष्ट प्रशिक्षकांच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींचे भवितव्य घडवत आहे.
‘फिनिक्स’ च्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण इतक्या चांगल्या पद्धतीने देण्यात आले, त्यामुळेच इंटरव्ह्यू देताना आत्मविश्वास वाढला, असे तस्फीयाने ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले. या अकादमीच्या माध्यमातून आजवर अनेक तरुण-तरुणींनी आपल्या करियरमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तरुणांना या अकादमीच्या माध्यमातून खूप सहकार्य केले जाते. इतर एव्हिएशन प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीच्या तुलनेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीची फी अत्यंत माफक आहे.
या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येते. शिवाय ज्याठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी इंटरव्यू देण्यासाठी अकादमीचे मोठे सहकार्यही मिळते, हि या अकादमीची खासियत आहे.