बेळगांव शहरातील सेंटपॉल हायस्कूलचा विद्यार्थी स्वरूप धनुचे याची मध्यप्रदेश भोपाळ येथे येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.
आगामी खेलो इंडिया स्पर्धेमध्ये स्वरूप धनुचे हा 100 मी. बटरफ्लाय, 200 मी. बटरफ्लाय आणि 400 मी. जलतरण शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. स्वरूप याला आई-वडिलांसह मुख्याध्यापक डॉ. सॅविओ एब्रो, उपमुख्याध्यापक सबस्टेन परेरा व क्रीडा प्रशिक्षक अँथोनीसर यांचे प्रोत्साहन
तसेच प्रशिक्षक एनआईएस कोच नटराज व्ही. आणि एनआईएस कोच विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
स्वरूप धनुचे हा बसवन गुडी एक्वेटिक सेंटर बेंगलोर येथे सध्या जलतरणाचा सराव करत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.