टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट नजीक श्री साई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून असलेला खड्डा सर्वांसाठी त्रासदायक ठरत असून तो बुजवण्याची मागणी केली जात आहे.
टिळकवाडी पहिल्या रेट रेल्वे गेट जवळील श्री साई मंदिर रोडवरील महापालिकेच्या बंदावस्थेतील गाळ्यांसमोर रस्त्यावर एक खड्डा पडला आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून हा खड्डा बुजवण्यात आलेला नाही.
त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी तो धोकादायक ठरत आहे. या खेरीज सदर खड्ड्यात पाणी साचून राहिल्यामुळे ते डासांचे उत्पत्ती स्थान बनले आहे.
हा खड्डा बुजून रस्ता व्यवस्थित करावा अशी वारंवार मागणी करून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील हा खड्डा तात्काळ बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे.