कॅपिटल वन ही संस्था बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्यपरंपरेचा इतिहास जोपासत गेली अकरा वर्षे बेळगाव शहरांमध्ये नाट्य चळवळ घडवून आणत आहे बेळगाव शहर व परिसरातील कलाकार, दिग्दर्शक निर्माते व रसिकाना कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या अनुषंगाने नाट्यपर्वणी उपलब्ध झालेली आहे.
सुरवातीला स्थानिक एकही संघाचा सहभाग नसलेल्या या स्पर्धेमध्ये लाक्षणिक वाढ झाली असून या कलाकारांनी आपल्या कलेचा आविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकलेली आहेत.ही नाट्य चळवळ घडवून आणण्यासाठी संस्थेने आंतरराज्य पातळीवर गोवा महाराष्ट्र कर्नाटक या तिन्ही
राज्यातील कलाकारांच्या सोबत स्थानिक कलाकारांनी देखील मोलाची साथ दिली आहे.
नवनवीन नाट्य कलाकारांना जुन्या जाणत्या कलाकारांसोबत जोडण्याचे कार्य संस्था स्पर्धेच्या निमित्ताने करीत आहे.आजवरचे नीटनेटके आयोजन व पारदर्शक निकालाच्या जोरावर स्पर्धा तिन्ही राज्यातील कलाकारांना नेहमीच आकर्षित करते.यामुळेच नाट्य कर्मी व रसिक या स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात आजवर या स्पर्धेने आपली एक विशीष्ट पातळी गाठली असून नामांकित स्पर्धांमध्ये संस्थेचा उललेख केला जात आहे. स्पर्धेसाठी संस्थेने वेळोवेळी परगावातील परीक्षकांचे सहकार्य व आधुनिकतेचा साज चढवीत संस्थेने वेगळाच नाट्यप्रपंच रुजविला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने बेळगाव शहरातील नाट्य कलाकारांबरोबरच पर गावातील स्पर्धक संघांना देखील रंगभूमीवरील वेगवेगळ्या अडचणींवर मात करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्था आजवर करीत आहे .
यावर्षीच्या स्पर्धेमध्ये देखील संस्थेने पहिल्यांदाच स्पर्धेसाठी प्राथमिक फेरी आयोजित केली होती सदर प्राथमिक फेरीसाठी एकूण 28 संघांनी आपला सहभाग नोंदविला.त्यामधून 14 संघांची निवड करण्यात आली असून या संघाची निवड ही संहिता आणि आभासी तत्त्वावर व तज्ञाबरोबर सखोल चर्चा करून करण्यात आलेली आहे.
निवड झालेल्या संघांची व एकांकिकांची नावे खालील प्रमाणे आहेत
*आंतरराज्य गट
नाट्यकला मराठी विभाग आरपीडी महाविद्यालय, बेळगांव
पॉज
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
चफी
साई कला मंच, इचलकरंजी • उत्कट आशीला क्षितिज नसत
लोकरंगभूमी, सांगली
शेवट तितका गंभीर नाही नाट्यशुभांगी, जयसिंगपूर
आनंद
राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि इस्लामपूर
तुम्ही OR NOT TO ME
महाशाला कला संगम, गोवा
अक्षरांचे डोही
हात धुवायला शिकवणारा माणुस
परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर
जंगल जंगल बटा चला है
| गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर
हिडीओ
•बाराखडी नाट्य मंडली, सातारा
ROK
आर. ओ. के.
रंगयात्रा नाटय संस्था, इचलकरंजी | हा वास कुठून येतोय?
कलासक्त, मुंबई
ओल्या भिंती
झिरो बजेट प्रोडक्शन, सिंधुदुर्ग
दिल ए नादान
*जिल्हा मर्यादित शालेय गट*
राहुल मोहनदास प्रोडक्शन, बेळगाव
अविस्मरणीय ह्याप्पी डेज
कॉमन टच प्रोडक्शन, बेळगाव वारी
महिला विध्यालय हायस्कुल, बेळगाव सत्यम शिवम सुंदरम
विध्यानिकेतन हायस्कुल, बेळगाव किल्ल्यातील चेटकीन
यावर्षी स्पर्धेसाठी सादर होणाऱ्या एकांकिका या एकापेक्षा एक वरचढ असणार आहेत.एकंदरीत बेळगावच्या चोखंदळ नाट्य रसिकांना यंदा दर्जेदार एकांकिका पाहता येणार आहेत.
सदर स्पर्धा सोमवार दि. 9 व मंगळवार दि.10 जानेवारी 2023 रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाल गल्ली बेळगाव येथे पार पडणार आहेत.
संस्थेतर्फे या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून काही जागा राखून ठेवल्या आहेत एकांकिकाच्या सादरीकरणाची वेळ एक तासाची असून संस्थेने बेळगाव नाट्य रसिकांनी आपल्या सोयीनुसार स्पर्धा पाहण्यास जरूर यावे पण प्रयोग सुरू असताना व्यत्यय आणू नये.एकांकिका सुरू असताना कोणालाही मध्येच नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सूचना संस्थेतर्फे करण्यात आले आहे.