Saturday, December 21, 2024

/

सिद्धरामय्या यांचे कोलारमधून निवडणूक लढविण्याचे नाटक -येडियुरप्पा

 belgaum

“आज मी स्वतः एक गोष्ट सांगेन, मी भाकित करत आहे असे समजू नका, सिद्धरामय्या कोणत्याही कारणास्तव कोलारमधून निवडणूक लढवणार नाहीत, ते नाटक करत आहेत आणि म्हैसूरला परत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी केला

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पक्षाच्या हायकमांडने सहमती दिल्यास ते कोलारमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना कोलारमधून निवडणूक लढवल्यास पराभवाला सामोरे जावे लागेल आणि घरी जावे लागेल याची जाणीव सिद्धरामय्या यांना आहे. ते राजकीय सर्कस आणि नाटक खेळत आहेत , माझ्या मते, ते कोलारमधून निवडणूक लढवणार नाहीत आणि म्हैसूरला परत जाण्याचा प्रयत्न करू शकतात असे सांगून जर तसे झाले तर आम्ही आवश्यक ती रणनीती करू, असे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले.

सिद्धरामय्या दोन जागांवर निवडणूक लढवतील या चर्चेबद्दल बोलताना भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळाचे सदस्य असलेल्या बी. एस. यडीयुराप्पा यांनी “मला याबद्दल माहिती नाही, ते त्यांच्या पक्षावर सोडले आहे.

त्यांना दोन जागांवर निवडणूक लढवू द्या किंवा तीन जागावर, त्यांचे घरी जाणे मात्र निश्चित आहे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.