छ्त्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण तोरणा किल्ल्यावरून बांधले आणि त्याच वेळी भगव्याची प्रेरणाही त्यांनी दिली.हिंदूचा ध्वज असेल तो भगवा आणि या भगव्याच्या सन्मानासाठी आपण लढले पाहिजे हाच भगवा घेऊन छ्त्रपती आयुष्यभर लढत आले आणि या भगव्याचा सन्मान अटकेपार मराठ्यांनी गाजवला.
भगव्या ध्वजाचा सन्मान आणि अभिमान प्रत्येक हिंदूंच्या मनात जागृत रहावा यासाठी घरा घरावर भगवा ही मोहीम श्रीराम सेना हिंदुस्थान च्या वतीने सीमा भागात राबवण्यात येत आहे.
भगवा ध्वज स्वाभिमानाने घरी आणावा पूजन करून घरावर चढवावा त्याचा दररोज सन्मान करावा असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले.भगवा कसा असावा त्याचा मान कसा राखावा त्याप्रती आदरभाव कसा ठेवावा ते हिंदुत्वाचे आणि मराठ्यांचे कसे प्रतिक आहे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.या सोबत ‘जिथं भगवा ध्वज ते घर हिंदूचे ‘ हा उदघोष देखील करण्यात आला.’आत्मभान’ ‘आत्म सन्मानासाठी भगवा’ ही प्रणाली सांगण्यात आली.
जुन्या गांधी नगर भागातून या मोहिमेचा आरंभ करण्यात आला आणि पूर्ण बेळगाव व परिसरात ही मोहीम राबवण्यात येणार आहे.कार्यकर्ते घरा घरात जाऊन भगव्या ध्वजा विषयी मार्गदर्शन करतील त्याच बरोबर भगवा घरावर का?याचेही प्रबोधन करतील अशी माहिती देण्यात आली.
घर घर भगवा आत्मभान आणि आत्म सन्मानासाठी भगवा ही घोषणा राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.श्रीराम सेना हिंदुस्तानचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.