Wednesday, January 1, 2025

/

शिवसैनिकांनीच ठरवलं शिवसेना वाढवायचं

 belgaum

बेळगाव शहरातील टिळक चौकामध्ये आज मंगळवारी शिवसेनेच्या निष्ठावंत स्वाभिमानी शिवसेनिकांतर्फे ‘शिवबंधन’ बांधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक नवयुवक शिवबंधन बांधून घेण्याद्वारे शिवतेजात बद्ध झाले.

टिळक चौक येथे शिवसेना अधिक बळकट आणि सक्रिय करण्यासाठी आज मंगळवारी कार्यकर्त्यांना ‘शिवबंधन’ बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसैनिक सचिन गोरले राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, बंडू केरवाडकर व चंद्रकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा कार्य पुढे जोमाने पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिवसैनिकांना उस्फूर्त मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना सीमाभागात आहे. मराठी माणूस आजपर्यंत शिवसेनेकडे आशेने बघत आला आहे. या मराठी माणसाच्या प्रत्येक हक्कासाठी प्रत्येक शिवसैनिकांना लढावं अशी सूचना साहित्यिक पाटील यांनी केली. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात शिवसेना वाढली पाहिजे. रुजली पाहिजे. कारण मराठी माणसाच्या हितासाठी आणि एकंदर भगव्याच्या रक्षणासाठी शिवसेना आत्तापर्यंत कटिबद्ध होती आणि ते कार्य पुढे नेण्याची गरज आहे.Shivsena

मोठ्या संख्येने युवा वर्ग शिवसेनेकडे आकर्षित होतोच. या युवकांना निश्चित स्नेह बंधनात आणि कार्य बंधनात बांधण्याचं काम हे शिवबंधन करतं. शिवतेजाने तेजाळलेल हे शिवबंधनच प्रतीक आपल्या बरोबर नेहमी असावं, या उद्देशाने हा शिवबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला ही अत्यंत स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल, असे ते म्हणाले.

प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या ध्येयपूर्तीकडे जाताना छ. शिवाजी महाराजांचे कार्य आणि इतिहासापासून प्रेरणा घेऊन तो पवित्र ग्रंथासारखा जपला पाहिजे. शिवरायांच्या आयुष्यातील धैर्य, शौर्य, आयोजन-नियोजन, प्रयोजन कशा पद्धतीने होते, हे ध्यानात घेऊन शिवसैनिकांनी ते आपल्या अंगात बाणवावे. आपल्या जीवनात अवलंबवावे, असे आवाहनही गुणवंत पाटील यांनी केले. टिळक चौक येथील कार्यक्रमात बेळगाव शहर व तालुक्यातील 100 हून अधिक नवयुवकांनी शिवबंधन बांधून घेतले. याप्रसंगी शिवसेनेचे हितचिंतक बहुसंख्येने हजर होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.