Monday, December 23, 2024

/

सीमा प्रश्नाच्या केस मध्ये हरीश साळवे हवेत :शरद पवार

 belgaum

बेळगाव सीमा प्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवर सिनियर कौन्सिल हरीश साळवे यांची नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले कोल्हापूर येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हे मत मांडले आहे

सीमाप्रश्नासंबंधी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत कोर्टात आपल्या राज्याची बाजू नीट मांडण्यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. येत्या १५ दिवसांत ही केस सुरू झाली आणि ती अंतिम निर्णयापर्यंत आली तर ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब असेल. अंतिम निर्णय घ्यायचा असेल तर सीमावासियांचे म्हणणे त्याठिकाणी योग्य पद्धतीने मांडले गेले पाहिजे, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. हरिश साळवे यांची नेमणूक या केससाठी करावी, त्यासाठी प्रयत्न करावे असेही या बैठकीत ठरवण्यात आले होते असेही ते म्हणाले.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट एकत्र तयारी करत आहोत. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असेही त्यांनी यावेळी म्हटल आहे.

सत्ता हातात असल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. पण मी आता बघतो की, सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधान याला तुरुंगात टाकेल, यांचा जामीन रद्द करेल वगैरे वगैरे अशी भाषा करत आहेत. हे खरं राजकीय लोकांचे काम नाही. परंतु या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे. मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात फिरलो आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहे. उद्या निवडणूक झाल्या की समाजाच्या त्यांच्याबद्दल भावना निश्चितच कळून येतील असेही त्यांनी नमूद केलं

Pawar sharad
Sharad Pawar

ते म्हणाले की महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.