Tuesday, December 24, 2024

/

द्वेषाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल : आम. जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : द्वेषाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला जनता चोख प्रत्युत्तर देईल, राजकारणच करायचे असेल तर विकासाचे राजकारण करा, असे खुले आव्हान यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी भाजपाला दिले.

यमकनमर्डी मतदारसंघातील शाहबंदर आणि इस्लामपूर या गावात वाल्मिकी पुतळा स्थापनेत अडथळे आणणाऱ्यांना निषेध करण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मागील निवडणुकीत प्रचार न करताही मला जनतेने निवडून दिले. मागील निवडणुकीत धनुष्यबाणाचा वापर करावा लागला नाही मात्र आगामी निवडणुकीसाठी वर्षभरापासून आपण धनुष्य आणि बाण घेऊनच बसलो आहोत, असा इशारा जारकीहोळींनी विरोधकांना दिला.

यमकनमर्डी मतदार संघात खास. अण्णासाहेब जोल्ले यांनी दिलेल्या प्रस्तावात तीन बसस्थानक उभारण्यात येणार असून याला आपला विरोध असल्याचे जारकीहोळी म्हणाले. इस्लामपूरमध्ये वाल्मिकी सर्कल परिसरात महर्षी वाल्मिकींचा पुतळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे बसस्थानक इतरत्र बांधण्यात यावे, असे मत त्यांनी मांडले.

यमकनमर्डी मतदार संघात कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून विकासकामे सुरु आहेत. मात्र या मतदारसंघात भाजप धर्माच्या नावावरून राजकारण करून द्वेष पसरवत आहे. धर्माच्या नावावरून होत असलेल्या राजकारणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मनुवादाच्या व्यवस्थेने मागासवर्गीयांचे आणि दलित समाजाचे शोषण केले आहे, या गोष्टी आता नागरिकांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजप आणि आरएसएसच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत बसवेश्वरांचे फोटो का लावण्यात आले नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदार संघात चौघांनी येऊन भाषण केले तर मतदारसंघाचा विकास होणार नाही. समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या व्यक्तींना दूर ठेवून काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले.

यावेळी युवा नेते राहुल जारकीहोळी, काँग्रेस नेते मकतुमसाब अप्पुबाई चाचा, शंकर डोंगरे, यल्लाप्पा हंचीनमणी, मंजुनाथ पाटील, महांतेश मगदूम, सिद्दू सुनगार, विजया तलवार, करेप्पा गुरन्नवर, जंगलीसाहेब नायक, किरण राजपूत यांच्यासह हजारो कार्यकर्ते शाहबंदर व इस्लामपूर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.