बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या C-60 दलातील विशेष कमांडोंना देण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणासाठी गेली ३ वर्षे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ब्रिगेडियर संतोष कुरूप यांची पुन्हा पुढील ३ वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला असून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी ब्रिगेडियर संतोष कुरूप यांची निवड करण्यात आली आहे.
ब्रिगेडियर संतोषकुमार कुरूप यांनी बेळगावच्या मराठा लाईट सेंटरमध्ये ३ वर्षे ब्रिगेडियर म्हणून काम पहिले आहे. बेळगावात मराठा सेंटर मध्ये सेवा बजावताना त्यांनी अनेक उपयोगी कार्ये केली होती.नागपूर मधून कुरूप यांनी गेली तीन वर्षे नक्षल विरोधी पथकाला विशेष प्रशिक्षण दिले होते त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला होता गेल्या तीन वर्षात नक्षल वादी कारवाईत महाराष्ट्रा कडून एकही जखमी झाला मात्र कुरूप यांनी प्रशिक्षण दिलेल्या पथकाकडून 60 नक्षल वाद्यांचा खात्मा झाला होता.
महाराष्ट्राच्या C-60 दलाच्या अंतर्गत कमांडोना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ते जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन नक्षलविरोधी कारवाया करतात. एवढेच नाही तर नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना भेटून त्यांना शासनाच्या योजना सांगून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही हे कमांडो करतात.
नागपूर मध्ये असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली सह महाराष्ट्रातील नक्षली कारवायांमध्ये सहभागी होतात. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी ब्रिगेडियर संतोष कुरूप यांच्या करारात पुढील ३ वर्षांसाठी वाढ करण्यात आली असून नक्षलग्रस्त भागात ब्रिगेडियर संतोषकुमार कुरूप विशेष पथकाला देणार प्रशिक्षण आहेत.