बेळगाव : एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करिअर बनविण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. यासाठी आवश्यक ज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाची गरज असते. बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीच्या माध्यमातून योग्य प्रशिक्षण घेऊन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बेळगावच्या माळी गल्ली येथील कु. साहिल धनंजय बडमंजी याने यश मिळविले आहे.
घरची परिस्थिती हलाखीची, ऐन तारुण्यात वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण झालेली आर्थिक टंचाई आणि अशा परिस्थितून आपल्या मामांच्या मदतीने पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी साहिलने घेतलेली मेहनत हि कौतुकास्पद आहे.
मराठी विद्यानिकेतन या शाळेतून पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे जैन महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्या साहिलने करियरची दिशा ठरविली आणि ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीची निवड केली.
या अकादमीत प्रशिक्षक सुश्मिता, जॉन, ओंकार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगळुरू येथे जॉब इंटरव्यू साठी गेलेल्या साहिलची पहिल्या टप्प्यातच निवड झाली. एव्हिएशनसाठी असलेल्या परीक्षेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या प्रशिक्षणावर आधारित पेपर असल्याने साहिलची निवड पहिल्या टप्प्यात झाली. बेंगळुरू विमानतळावर एअर इंडिया कंपनीत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून निवड झालेल्या साहिलला पुढे याच क्षेत्रात पुढील करियर करण्याची इच्छा आहे. शिवाय याठिकाणी नोकरी करत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचीही त्याची इच्छा आहे.
या अकादमीच्या माध्यमातून आजवर अनेक तरुण-तरुणींनी आपल्या करियरमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तरुणांना या अकादमीच्या माध्यमातून खूप सहकार्य केले जाते.
इतर एव्हिएशन प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीच्या तुलनेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीची फी अत्यंत माफक आहे. या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येते. शिवाय ज्याठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी इंटरव्यू देण्यासाठी अकादमीचे मोठे सहकार्यही मिळते, हि या अकादमीची खासियत आहे.