रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ पोलिस ठाण्यांतर्गत चिंचनूरजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा जिल्हा प्रभारी मंत्री गोविंदा कारजोळ यांनी केली आहे.
सौंदत्ती यल्लम्मा रेणुका देवी दर्शनासाठी जात असताना महेंद्र गुड्सचे वाहन झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील सहा भाविक ठार झाले आहेत.या अपघातात 16 जण जखमी झाले असून,जखमींवर आवश्यक उपचार केले जात आहेत. बेळगाव : यल्लमा डोंगरावर येथे भाविकांना घेऊन जाणारे वाहन भरधाव वेगात झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एकूण 6 जण ठार झाले.
चिंचनूरजवळील विठ्ठला मंदिराजवळ झालेल्या अपघातात हनमव्वा नाकाडी-25, दीपा-32, सविता-17, सुप्रीता-11, मारुती-42, इंदरव्वा-24 यापैकी जणांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली आहे.
जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जखमींच्या आवश्यक उपचारासाठी यापूर्वीच कळविण्यात आले आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला ईश्वर चिरशांती देवो, अशी प्रार्थना जिल्हा प्रभारी मंत्री गोविंदा काराजोळ यांनी केली.मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपणही सहभागी असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.