Monday, December 23, 2024

/

कीदवाई कॅन्सर हॉस्पिटल प्रस्ताव अद्याप प्रलंबित

 belgaum

वडगाव, बेळगाव येथे कीदवाई कॅन्सर हॉस्पिटल (कीदवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी) उभारणीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून या हॉस्पिटलच्या उभारणीची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे.

आरोग्य खात्याच्या आयुक्तांनी गेल्या वर्षी पत्रकार परिषदेमध्ये वडगाव येथील कीदवाई कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी महिन्याभरात सुरू केली जाईल असे घोषित केले होते. मात्र आता तब्बल वर्ष उलटून गेले तरी या हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. कॅन्सर अर्थात कर्करोगाच्या उपचारावर सुप्रसिद्ध असलेले बेंगलोरच्या कीदवाई कॅन्सर हॉस्पिटल शाखेसाठी पर्यायी ठिकाणाचा शोध सुरू आहे.

यासंदर्भात बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सरकारी सरकारी खुल्या जागेत कीदवाईचे पर्यायी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला प्राथमिक मान्यता मिळाली असली तरी अद्याप त्यावर अंतिम शिक्कामोतर्ब झालेले नाही. दरम्यान आरोग्य विभागाकडून अन्य पर्यायी जागेची चाचपणी सुरू आहे. कीदवाई कॅन्सर हॉस्पिटलची शाखा बेळगावात सुरू करण्याची योजना असली तरी ती अद्याप प्रलंबित आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना बेळगावातील कीदवाई हॉस्पिटल साठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र त्यानंतर या संदर्भात कोणतीच हालचाल झालेली नाही. जर या हॉस्पिटलची उभारणी झाल्यास बेळगावसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

कारण या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात आधुनिक उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. या खेरीज या हॉस्पिटलमुळे बेंगलोर येथील कीदवाई कॅन्सर हॉस्पिटल वरील ताण देखील कमी होणार आहे. वडगाव येथील किदवाई कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी 130 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.