Saturday, January 11, 2025

/

‘ओबीसी’ बाबत घ्या खबरदारी – नगरसेवकांची मागणी

 belgaum

बेळगाव महापालिकेचे उपमहापौरपद इतर मागास जाती -ब प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असून सदर जात प्रमाणपत्र संपूर्ण तपासणी व पडताळणी अंती इच्छुक उमेदवारांना अदा केले जावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे व अन्य कांही नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीसह काँग्रेस,  व अपक्ष नगरसेवकांनी आज मंगळवारी सकाळी सादर केलेले उपरोक्त मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांच्या सहाय्यकानी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे आणि सदर पद हे इतर मागास जाती -ब (ओबीसी -बी) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ओबीसी -बी प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. तेंव्हा आमची विनंती आहे की उमेदवाराच्या कागदपत्रांची संपूर्ण तपासणी व पडताळणी करून त्याला ओबीसी -बी प्रमाणपत्र अदा केले जावे. त्याचप्रमाणे हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी उमेदवाराकडून आयकर खात्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे.

पुढील वाद, खटले व परिणाम टाळण्यासाठी या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना करावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील प्रादेशिक आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, लक्ष्मी लोकरी, अफरोज मुल्ला आदी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.Corporator

दरम्यान, या सर्व नगरसेवकांनी काल सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना भेटून उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांनाही सादर केले होते. तेंव्हा निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार कुलकर्णी यांना त्या संदर्भात कडक सूचना केली आहे. त्यामुळे आता इतर मागास -ब प्रवर्गाचे प्रमाणपत्र देताना तहसीलदारांना हलगर्जी करता येणार नाही. हे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यकता असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची सक्ती अर्जदारांना केली जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वैशाली भातकांडे व काँग्रेसच्या ज्योती कडोलकर या दोन नगरसेविका इतर मागास ब प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. यावेळी उपमहापौर पद इतर मागास -ब प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. तथापी महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपकडे या प्रवर्गातील उमेदवार नाही.

त्यामुळे पूर्ण बहुमत असूनही भाजपला उपमहापौर पदावर पाणी सोडावे लागण्याची स्थिती सध्या आहे. मात्र सामान्य प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविकांसाठी इतर मागास -ब प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे विरोधी गटाच्या नगरसेवकांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते. त्यानंतर आज त्यांनी प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.