बेळगाव लाईव्ह : बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघातर्फे स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता कडोली येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज मैदान येथे स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अभिनेते आणि महाराष्ट्रातील शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे असून या कार्यक्रमास कसबा येथील रामनाथगिरी समाधी मठाचे राष्ट्रीय धर्माचार्य प. पु. भगवानगिरी महाराज तसेच कडोली दुरदुन्डेश्वर विरक्त मठाचे प. पु. श्री गुरु बसवलिंग महास्वामीजी यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.
खासदार अमोल कोल्हे बेळगावात pic.twitter.com/jrs1W9HTr6
— Belgaumlive (@belgaumlive) January 10, 2023
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील दोन महिन्यापूर्वी अमोल कोल्हे हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील बेळगाव दौऱ्यावर आले होत आता कडोली येथील स्वराज्य संकल्प मेळाव्याला त्यांची उपस्थिती असणार आहे.