बेळगाव लाईव्ह : गुलियन बॅरे सिंड्रोम (Miller Fisher Variant) या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या गणेश मांगलेकर या ३३ वर्षीय तरुणावर डॉ. व्ही. ए. कोटीवाले यांच्या अंतर्गत उपचार सुरु आहेत. या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
या आजारासाठी त्याला देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची किंमत १७९८५/- रुपये इतकी आहे. अशी एकूण ७ इंजेक्शन या तरुणाला देण्याची आवश्यकता असून त्याच्यावर केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील मलप्रभा (फ्री वॉर्ड) वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
सदर रुग्णाचा आयपी क्रमांक ११६२९९२ आणि बेड क्रमांक जीजे ६२ असा आहे. सदर तरुण हा यंत्रमागावर कामाला जाऊन चरितार्थ चालवत आहे. या तरुणावर संपूर्ण घराची जबाबदारी असून आई, बहीण आणि बहिणीची मुलेदेखील त्याच्यावर अवलंबून आहेत.
समाजातील दानशूर व्यक्तींनी या तरुणाच्या उपचारासाठी त्याच्या पुढील बँक खात्यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बँक तपशील : युनियन बँक ऑफ इंडिया – आरपीडी कॉलेज कंपाउंड बेळगाव.
खाते क्रमांक : 527802120000052
आयएफएससी : UBIN0552780
फोन पे / गुगल पे क्रमांक : 9632338047.