Thursday, January 23, 2025

/

स्त्रियांना प्रोत्साहन देणे काळाची गरज -प्रा. मायाप्पा पाटील

 belgaum

स्त्री -पुरुष असा कोणताच भेदभाव न करता एकमेकांनी एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. सर्वांनी मतभेद आणि भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करायला हवी, असे विचार राणी पार्वातीदेव पदवी महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.

काकती (ता. जि. बेळगाव) येथील ज्योती गवी फाऊंडेशनतर्फे गेल्या सोमवारी श्री सिध्देश्वर देवस्थान मंदिर कार्यालय येथे सायंकाळी आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यान आणि तिळगुळ वाटप असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी’महिला सक्षमीकरण आणि आजच्या काळातील स्त्री : जिजामातांचा आदर्श एक चिंतन’ या विषयावर प्रमुख वक्ते या नात्याने प्रा. पाटील बोलत होते. कित्तूर राणी चन्नम्मा, जिजामाता, झाशीची राणी, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले, युसुफजाई मालाला, सिंधूताई सपकाळ, पी टी. उषा, कल्पणा चावला, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या कार्यातून आपला ठसा उमटवला आहे. या सर्वांचा आदर्श घेऊन आजच्या स्त्रियांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, राजकिय, शिक्षण, कला क्रीडा, सहकार, धार्मिक, मानसिक संतुलन, आरोग्यउद्योग यासह अनेक क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करावी. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, संत तुकाराम यासह अनेक थोर महामानवाचे विचार आत्मसात करून त्यांनी ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असे सांगून आजच्या काळात स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे;

आज स्त्रियांनी अबला नाही तर सबला होण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रा. मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.Til gul

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी सिधाप्पा टुमरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते राहुल जारकेहोळी व प्रेमा येतोजी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फोटो पूजन व दीप प्रज्वलन झाले. यावेळी सुनिल सुनगार, यल्लाप्पा कोळेकर, उपाध्यक्षा वर्षा मुचंडिकर, मलगौडा पाटील, सागर पिंगट, पूनम कांबळे, लक्ष्मी कांनशिडे उपस्थित होते. स्वागत सुजाता बेळगावकर यांनी केले. प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि माजी ग्रा. पं. अध्यक्षा, विद्यमान सदस्या व समाजसेविका ज्योती गवी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अनिता धोंजी व लता मोहिते पाटील यांनी करुन दिला.

सुनिता गवानी, विद्या केसकर, सिद्दक्की अंकलगी, गीता बेळगावी व सुषमा वांजरे यांनी रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संदेश दिला. कार्यक्रमास गजानन गावांनी, महेश तंबाखूवाले, भावकांना टुमरी, अनिल पाटील, अरुण टुमरी, प्रा. निलेश शिंदे, लक्ष्मी कुरबर, दिनेश गवी, वैभव गवी, सुधिर लोहार, उदय पाटील, ए. व्ही. सुतार, नितीन पाटील, एस. एस. पाटील, विजय पाटील, अजित पाटील एन. जी.पाटील आदींसह विविध संघटना, व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी , सदस्य, कर्मचारी, महिला, विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन एस. व्ही. पाटील आणि कविता सोनुलकर यांनी केले. शेवटी जयश्री टुमरी यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.