कुद्रेमानी येथील श्री बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी ग्रामस्थ आयोजित 17 वे साहित्य संमेलन रविवार दि. 15 रोजी होणार आहे. कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणावर उभारलेल्या कै. परशराम मिनाजी गुरव साहित्य नगरीमध्ये संमेलन आयोजित केले आहे.
संमेलनाध्यक्षपदी मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. विजय चोरमारे राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
व्यासपीठ उद्घाटन आर. एम. चौगुले, सभामंडपाचे उद्घाटन वैजनाथ पाटील करणार आहेत. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, तानाजी पाटील, सिद्धार्थ हुंदरे उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संघाचे अध्यक्ष मारुती पाटील प्रास्ताविक करणार असून संमेलनाध्यक्ष नागेश राजगोळकर आहेत. यावेळी डॉ. विनोद कांबळे संपादित सीमाप्रदेश, बोली व स्वरुप व डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अक्षरलिपी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
दुसर्या सत्रात मंगसुळी येथील कवी आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यामध्ये कराड येथील थळेंद्र लोखंडे, बेळगाव येथील हर्षदा सुंठणकर, कुद्रेमानी येथील अमृत पाटील सहभागी होणार आहेत.
तिसर्या सत्रात शिराळा येथील बाबा परीट यांचे कथाकथन तर शेवटच्या सत्रात गडहिंग्लज येथील आत्माराम पाटील यांचे आनंदाने जगू या या विषयांवर व्याख्यान होणार आहे.