बेळगाव : मीटर रिडींग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने हेस्कॉमने मीटर रिडींग संदर्भात नवा निर्णय घेतला आहे. दर महिन्याच्या १ ते १५ तारखेदरम्यान होणारे मीटर रिडींग आता प्रत्येक महिन्यात १ ते ६ तारखेदरम्यान करण्याचा निर्णय हेस्कॉमने घेतले आहे.
२०२३ सलत जानेवारी महिन्यापासूनच हा बदल करण्यात आल्याने यापुढे नागरिकांना बिल भरणे सोयीस्कर ठरणार आहे. बिल दिल्यापासून ठराविक मुदतीत भरणे अनिवार्य होते. मात्र या कालावधीत अधिक वेळ लागत असल्याने मीटर रिडींग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
घरगुती मीटर, औद्योगिक मीटर, व्यावसायिक, सोलार तसेच इतर रिडींग प्रत्येक महिन्यात १ ते ६ तारखेदरम्यानच घेतले जाणार आहे. मीटर रिडींग करण्यासाठी शहरी भागात हेस्कॉमचे कर्मचारी कार्यरत आहेत तर ग्रामीण भागात कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
थकीत वीजबिलामुळे हेस्कॉमची थकबाकी वाढली होती. यामुळे गेल्या २ महिन्यांपासून वीजबिले वेळेत न भरणाऱ्या ग्राहकांना हेस्कॉमने धारेवर धरत दणका दिला होता. आता मीटर रिडींग वेळेतच बदल करण्यात आल्याने हि बाब ग्राहकांना देखील सोयीची ठरणार आहे. शिवाय वीजबिलाची प्रक्रियाही सोपी होणार आहे.