सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर निडी प्रकल्पा अंतर्गत समाजातील गरजू मुलांसाठी विशेष करून गरीब दिव्यांग लहान मुलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमास नागरिकांनी हातभार लावण्याचे आवाहन सीईओ प्रेमा पाटील यांनी केले आहे.
गरिबी रेषेखालील समाजातील दिव्यांग 10 वर्षाखालील लहान मुलांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी त्यांना कुबड्या, व्हीलचेअर आणि आवश्यक अन्य साधनं भेट म्हणून देण्यासाठी हेल्प फाॅर निडी प्रकल्पांतर्गत निधी उभारण्यात येत आहे.
संबंधित साधनांमुळे दिव्यांग मुलांना समाजात स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासाने आपले जीवन जगता येणार आहे. सदर कुबड्या, व्हीलचेअर आदी साधनांचा वितरण कार्यक्रम येत्या रविवार दि. 22 जानेवारी रोजी आयोजित केला आहे. गेल्या वर्षी या उपक्रमा अंतर्गत 11 गरजू मुलांना मदत करण्यात आली होती.
तरी नागरिकांनी औदार्य दाखवून या उपक्रमाला सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन हेल्प फाॅर निडी प्रकल्पाच्या सीईओ प्रेमा पाटील यांनी केले आहे. तसेच इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9686632685 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविले आहे.