बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून हलगा या गावात माकडांनी धुमाकूळ घातला असून यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. माकडांच्या मर्कटलीलांनी गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माकडांच्या मर्कटलीलांना वैतागलेल्या ग्रामस्थांनी माकडांना जेरबंद करण्यासाठी मागणी केली होती.
या मागणीनुसार ग्रामपंचायतीने माकड पकडण्याची मोहीम हाती घेत माकडांना जेरबंद केले आहे. यामुळे ग्रामस्थांची माकडांच्या उपदव्यापापासून सुटका झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हलगा भागात माकडांच्या कळपाने उच्छाद मांडला होता. अनेक ठिकाणची घरे लक्ष्य करत घरांची कौले, काचा, खिडक्या आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान माकडांनी केले आहे. या माकडांना अनेकवेळा हुसकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, माकडांचा उच्छाद काही केल्या कमी झाला नाही.
माकडांच्या मर्कटलीलांमुळे होणाऱ्या नुकसानीला वैतागून तातडीने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती.
या मागणीनुसार ग्रामपंचायतीने माकडांना पकडून जेरबंद केले आहे. माकड पकडण्याच्या मोहिमेमुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.