Sunday, December 29, 2024

/

नॅशनल वेटलिफ्टिंगमध्ये अक्षता कामतीला “सुवर्ण”

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची  होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने तामिळनाडू येथील नागरकोईल येथे झालेल्या नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ८७ किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता बसवानी कामतीने सुवर्णपदक पटकाविले आहे.

शुक्रवार 6 जानेवरी रोजी झालेल्या वेटलिफ्टिंगच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले आहे.

बेळगाव तालुक्यातील हलगा गावची कन्या अक्षताने या आधीही ७ सुवर्णपदके पटकाविली असून खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये तिने हॅट्रिक केली आहे. आतापर्यंत अक्षता ७ सुवर्णपदकांची मानकरी ठरली असून तामिळनाडू येथे इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन अंतर्गत सुरु असलेल्या चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा १ सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

आतापर्यंत एकूण ७ सुवर्णपदके तिने ज्युनियर गटातून मिळविली असून तामिळनाडू येथील चॅम्पियनशिपमध्ये यंदा सिनियर गटातून तिने सुवर्णपदक मिळविले आहे. अक्षतांच्या या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.हलगा येथील शेतकऱ्याची मुलगी असलेल्या अक्षता या अगोदर खेलो इंडिया च्या यशाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली होती आणि मन की बात मध्ये तिच्या यशाचा उल्लेख केला होता.

भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) जवाहरलाल नेहरु स्टेडियम नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अक्षता कामती हिला उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा राष्ट्रीय स्तरावरील’संस्थात्मक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात तिने राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले होते.

अक्षता कामती ही गेल्या 2017 सालापासून राष्ट्रीयस्तरावरील महिलांची कनिष्ठ व वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धा आणि खेलो इंडियामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी नोंदवत आहे. याखेरीज अन्य स्पर्धांमध्ये देखील भरीव कामगिरी नोंदविली आहे.

अक्षताचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हालगा येथील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले असून हरियाणा येथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ती पंजाब येथील लव्हली युनिव्हर्सिटीमध्ये बीएचा अभ्यासक्रम शिकत आहे. अक्षता ही दिवसातून सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळी एकूण जवळपास 6 तास वेटलिफ्टिंगचा सराव करते. तिला प्रशिक्षक वीरूपाल यांचे मार्गदर्शन आणि आई वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल अक्षता कामती हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.