गुरु खिलारे यांचे “मनातल्या गप्पा”**व्यंगचित्र प्रदर्शन २८ पासून बेळगावात* सर्वांना मोफत प्रवेश : व्यंगचित्र काढून घेण्याची संधी
बेळगाव – व्यंगचित्रकार गुरु खिलारे यांच्या आयुष्यातील गमतीजमतीतून निर्माण होणारे हास्य अनुभवणारे “मनातल्या गप्पा”हे व्यंगचित्र प्रदर्शन 28 ते 30 जानेवारी या काळात बेळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहे. शहर आणि परिसरातील कला रसिकांनी याचा सहकुटुंब लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
28 ते 30 जानेवारी असे तीन दिवस हे प्रदर्शन कला महर्षी के बी कुलकर्णी आर्ट गॅलरी, वरेरकर नाट्य संघ, टिळकवाडी येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
“डूडलिंग लाईफ स्प्रेडलींग लाफ्टर” अशी या प्रदर्शनाची थीम लाईन असून साध्या-साध्या गोष्टीतील निर्भेळ आनंद आणि व्यंग या प्रदर्शनामधून पाहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरु खिलारे यांच्या मातोश्री व सासूबाई यांच्या हस्ते तसेच प्रसिद्ध चित्रकार माजगावकर, निर्मळे गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार बालमुकुंद पत्की, . वर सौ. पाटणेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
*स्वतःचे व्यंगचित्र काढून घेण्याची संधी*
प्रदर्शनादरम्यान तिन्ही दिवस सकाळी अकरा ते एक आणि सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत लाईव्ह इव्हेंट आणि फ्री डेमो आयोजित केला आहे. यावेळी उपस्थित रसिकांपैकी ज्यांची इच्छा असेल त्यांना स्वतःचे किंवा त्यांनी सोबत आणलेल्या छायाचित्राप्रमाणे त्यांच्या आप्तस्वकियाचे एक व्यंगचित्र भेट स्वरूपात दिले जाणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त बेळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरु खिलारे मित्र मंडळाने केले आहे.