हॉस्पिटलच्या आवारात बुधवार दिनांक 04/ 01/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे ज्याचा कुणाचा हा दागिना असेल त्यांनी ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.
मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प बेळगाव येथे उपचारांची सोय केलेल्या सून त्या ठिकाणी विविध रुग्णांची तपासणी करण्यात येते. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सेवेत असणारे जवान आणि निवृत्त जवान यांना या ठिकाणी उपचार केले जातात.
या ठिकाणी दोन वेगवेगळे कक्ष उभारले आहेत. 1) निवृत्त जवान उपचार विभाग केंद्र 2) सध्या सेवेत असलेले जवान उपचार विभाग केंद्र.असे वेगवेगळे दोन कक्ष उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली जाते.
सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख पटवून देऊन कोणाचा आहे तो दागिना घेऊन जावा. दागिन्यांची ओळख पटवून देण्या साठी त्या 1) दागिन्याचा असलेला फोटो, 2) दागिना घेतलेली रीतसर पावती, 3) कोणाच्या दागिना आहे त्याचा आधार कार्ड, 4) स्वतःचा फोटो आयडी साइज ही सगळी कागदपत्रे घेऊन येणे अतिशय महत्त्वाच्या असून सक्तीचे आहे.
भारी किमतीच्या सोन्याचा दागिना हरवलेला असून त्याची किंमत खूप मोठी होऊ शकते. वस्तू पडल्यानंतर त्यांना विरह होऊ शकतोच दुःख होऊ शकते त्यासाठी प्रामाणिकपणे त्याला वापस करणे समाजाची जबाबदारी असते पण असे दुर्मिळ प्रसंग घडतात आणि एखादाच प्रामाणिक व्यक्ती या ठिकाणी दिसून येतो त्यामध्ये निवृत्त जवान सुरेशराव देसाई ( उचगाव बेळगाव ), बेळगावचे समाजसेवक आणि माजी नगरसेवक अनिल पाटील (वडगाव, बेळगांव ), उमा शंकर देसाई ( उचगाव बेळगाव ) यांना हा दागिना सापडलेला असून त्यांनी आवाहन केलेले आहे की; ज्यांचा कुणाचा दागिना असेल त्यांनी ओळख पटवून देऊन घेऊन जावे असे आवाहन केलेले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क -* 07019956539, * 08748888979